पाऊस कोसळे हा
अंधारले दिसे
डोळे भरून आले
माझे असे कसे?
गेल्या बुडून वाटा
गेली बुडून राने
झाले उदास गाणे
माझे असे कसे?
या पावलांस लाटा
ओढून खोल नेती
हे प्राण ओढ घेती
माझे असे कसे?
का सांग याद येते?
एकांत हा सभोती
हे सूर डोह होती
माझे असे कसे?
पाऊस कोसळे हा
अंधारले दिसे
डोळे भरून आले
माझे असे कसे?
गेल्या बुडून वाटा
गेली बुडून राने
झाले उदास गाणे
माझे असे कसे?
या पावलांस लाटा
ओढून खोल नेती
हे प्राण ओढ घेती
माझे असे कसे?
का सांग याद येते?
एकांत हा सभोती
हे सूर डोह होती
माझे असे कसे?

Mangesh Keshav Padgaonkar (10 March 1929 – 30 December 2015) was a Marathi poet . Padgaonkar was born on 10 March 1929 in Vengurla, Sindhudurg district in Maharashtra. He received a Master of Arts degree in Marathi and Sanskrit from the University of Bombay.…
View profile & all 6 Poems / Storiesपाऊस आला रे आलाधारा झेला रे झेला
भेट तुझीमाझी स्मरते अजुन त्या दिसाचीधुंद वादळाची होती रात्र पावसाची
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणीअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥
हात तुझा हातातुनधुंद ही हवा
रात्रीं झडलेल्या धारांचीओल अजूनहि अंधारावर