हात तुझा हातातुन's image
0585

हात तुझा हातातुन

ShareBookmarks

हात तुझा हातातुन
धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज
भासतो नवा
रोजचेच हे वारे
रोजचेच तारे
भासते परि नवीन
विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची
भारते जीवा
या हळव्या पाण्यावर
मोहरल्या छाया
मोहरले हृदय तसे
मोहरली काया
चांदण्यात थरथरतो
मधुर गारवा
जन्म जन्म दुर्मिळ हा
क्षण असला येतो
स्वप्‍नांच्या वाटेने
चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा
उमलतो थवा
क्षणभर मिटले डोळे
सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज
रक्तातुन वाहे
आज फुले प्राणातून
केशरी दिवा

Read More! Learn More!

Sootradhar