
दूर डोंगरांची घळ
तिथे आहे शिवालय,
अशा भासाने गोंदते
बया बदकांचे पायदेव
बाभलीचा काटा
त्याला हळदीचा डंख,
पायी स्वस्तिक कोरता
हाती बदकांचे पंख!
डबक्यातून बदके
येती चालत गावाला,
तशी स्वस्तिकांची माळ
झोंबे शिवाच्या पायाला
बया! काय म्हणायचे?
नाव तिचे ना विरक्ती?
सत्य मांडताना बाई
थोडी लागते आसक्ती!
तरी सुगाव्याचे भूत
बसे तिच्या मानगुटी,
शिवालयातील घंटा!
नाद तिच्याही ललाटी|दूर डोंगरांची घळ
तिथे आहे शिवालय,
अशा भासाने गोंदते
बया बदकांचे पायदेव
बाभलीचा काटा
त्याला हळदीचा डंख,
पायी स्वस्तिक कोरता
हाती बदकांचे पंख!
डबक्यातून बदके
येती चालत गावाला,
तशी स्वस्तिकांची माळ
झोंबे शिवाच्या पायाला
बया! काय म्हणायचे?
नाव तिचे ना विरक्ती?
सत्य मांडताना बाई
थोडी लागते आसक्ती!
तरी सुगाव्याचे भूत
बसे तिच्या मानगुटी,
शिवालयातील घंटा!
नाद तिच्याही ललाटी|
Read More! Learn More!