त्या तिथे
पलिकडे तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे!
गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे
कौलावर गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत हे केवढे !
तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो
तिथे मनास सापडे
त्या तिथे
पलिकडे तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे!
गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे
कौलावर गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत हे केवढे !
तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो
तिथे मनास सापडे

Gajānan Digambar Mādguḷkar (1 October 1919 – 14 December 1977) was a Marāthi poet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Mahārāshtra by just his initials as Ga Di Mā (गदिमा). He was awarded Sangeet Natak Akademi Awa…
View profile & all 7 Poems / Storiesइवल्याइवल्याशाटिकल्याटिकल्यांचें
आईसारखे दैवत सार् या जगतावर नाहीम्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
चांदोबा चांदोबा भागलास का,लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का,
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठीसैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी
माणुसकीच्या शत्रुसंगेयुद्ध आमुचे सुरू