
भर उन्हांत बसली धरुन सावली गुरं
न्हाइ चिंता त्यांची तिन्ही सांजपातुर
चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर
चढताचढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंद
तुम्ही बाळपासून जिवांचं लई मैतर
ही तरुणपणातील बाळपणाची लहर
कुणी बघत नाही तो चला गडे लौकर
आंबटगोडी चाखु वाटते पुरवा की छंद
जाळीमंदी पिकली करवंद
मज लाज वाटते सांगाया ते धनी
घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी
पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी
दर्या टेकड्या चला धुंडुया होउनी बेबंद
जाळीमंदी पिकली करवंद
Read More! Learn More!