कुणि जाल का, सांगाल का's image
1 min read

कुणि जाल का, सांगाल का

Atmaram Ravaji DeshpandeAtmaram Ravaji Deshpande
0 Bookmarks 293 Reads0 Likes

कुणि जाल का, सांगाल का,
सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको,
खुलवू नको अपुला गळाआधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली

फार पूर्वीचा दिला तो
श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला
काळोख मी कुरवाळिला

सांभाळुनी माझ्या जिवाला
मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली
हलकी निजेची पाउले

सांगाल का त्या कोकिळा,
की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी
रात्र जागून काढली

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts