अजुनी रुसूनी आहे's image
0921

अजुनी रुसूनी आहे

ShareBookmarks

अजुनी रुसूनी आहे

अजुनी रुसूनी आहे,
खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ
की पाकळी हले ना!

समजूत मी करावी
म्हणुनीच तू रुसावे
मी हांस सांगताच
रडतांहि तू हसावे
ते आज का नसावे?
समजावणी पटे ना
धरिला असा अबोला
की बोल बोलवेना!की गूढ काही डाव?
वरचा न हा तरंग!
घेण्यास खोल ठाव,
बघण्यास अंतरंग?
रुसवा असा कसा हा,
ज्या आपले कळेना?
अजुनी रुसूनी आहे,
खुलता कळी खुले ना!

आत्माराम रावजी देशपांडे

Read More! Learn More!

Sootradhar