येई झुळूक अन मन वाऱ्यासवे झुले

स्मृति जागती अशा, जैशी बहरती फुले


समजू नकोस गं, अबला या जगात तू

धरती तुझीच अन बघ हे गगनही खुले


कार्टून्सच्या जगी रमण्याऐवजी जरा

न्याहाळतील का चांदोबास ही मुले ?


आई-वडील तर कामावरच दिवसभर

हितगुज कसे बरे मग करणार सानुले ?


मोहात ना कधी, माझा जीव गुंतला

हे शब्द सोबती, बाकी काय आपुले ?


विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.