जाहलो मी बघा बावरा यारहो

साजणीचा असा चेहरा यारहो


येतसे मंदिरी रोजच्या पैठणी

शाल आईसही पांघरा यारहो


ही बघा चालली पावले वाकडी

ह्या घराला कुठे उंबरा यारहो ?


सोडुनी पाखरे दूर गेली नभी

पोरका जाहला पिंजरा यारहो


"खेचुनी पाय तू ध्येय गाठायचे"

बोलली अंतरी, 'मंथरा' यारहो


● विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.