कवडसे…. (गझल)


ते उन्हाचे कवडसे

थेट हृदयातच धसे


लख्ख शहराहून प्रिय

गाव मजला छानसे


सुख गरीबाच्या घरी

टिकत नाही फारसे


दानवांहूनी अधिक

क्रूर झाली माणसे


घटत गेले 'वाघ' अन्

वाढले भित्रे ससे


नाश पाण्याचा इथे

कोरडे तिथले घसे


धूर्त हे जग 'विश्वजित'

सत्य जिंकेलच कसे ?


• विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.