जगलो इतका तरी जगायचेच राहिले
मजला अनुभव बरेच यायचेच राहिले
गतस्वप्नांची दशा बघून मी शहारलो
अन् स्वप्न नवे पुन्हा विणायचेच राहिले
घासून-पुसून जाहले शरीर स्वच्छ पण
केवळ मन तेवढे पुसायचेच राहिले
तू दोस्त तरी असा कसा दिलास फैसला
माझे म्हणणे तुला कळायचेच राहिले
इतक्यातच तू कशास थांबलास 'विश्वजित'
पर्वत कित्येक बघ....चढायचेच राहिले
विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
