गावाकडची विहीर अन् ती मोट पाहिजे

त्या गोड गोड पाण्याचा मज घोट पाहिजे


त्या तत्वांशी आमचे काय देणे-घेणे ?

आम्हास फक्त गांधीजींची नोट पाहिजे


कुठवर असेच गप्प बसणार आम्ही सगळे ?

या सुस्तांना जागविणारा स्फोट पाहिजे


दंगली करा, पैसे वाटा, वा धमक्या द्या

काही करून निवडणूकीत वोट पाहिजे


खबरदार जर धोतर - लुंगी घातली कुणी

विचार नकोत ; अंगात मात्र कोट पाहिजे *


● विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.


(* पार्श्वभूमी : मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. हरिपरांथम यांना तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या क्लबने त्यांनी लुंगी परिधान केल्याने एका कार्यक्रमात प्रवेश नाकारला होता.)