कबूल आहे नसायचो मी घरात बाळा
असायचा मात्र जीव माझा तुझ्यात बाळा
अपूर्ण राहू नये तुझी कोणतीच इच्छा
म्हणून राहायचो जुन्याशा बुटात बाळा
तुझ्याचसाठी करायचो कष्ट एवढे मी
भुलून गेलास सर्व एका क्षणात बाळा
तुला जरी वाटतोय रे मी नकोनकोसा
सदैव तू राहशील माझ्या मनात बाळा
"सुखात न्हावे सदैव तू" हीच एक इच्छा
कसाबसा मी जगेल वृद्धाश्रमात बाळा
● विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
