वाट जरी खडतर असली तरी मी ठाम आहे
निवडलीच आहे तर चालून पूर्ण करणं काम आहे
वाईट जरी काही घडले असले तरी तो गेलेला काल आहे
आव्हानांना आव्हान द्यायला तर उभा आज आहे
यशाची स्वप्न बघताय मग अपयशाला घाबरून कसे चालेल, आणि हो गोड फळे आणखी गोड लागतं जेव्हा कडू फळ खाऊन झाले असेल
शरीराला स्पर्श करून गेलेल्या वार्याची किंमत आपण तेव्हाच तर जाणतो जेव्हा उन्हाने जीव कासावीस झालेला असतो
थोड्याशा दुःखाने खचून जाऊ नको
कारण उन्हानंतर पुन्हा पाऊस पडणार असतो
ध्येय ठरव त्याचा ध्यास लागू दे तुझ्या आवडत्या कामात तू स्वतः ला वाहुन घे


