दूर असूनही खूप जवळ आहेस तू,

मनाला पडलेली सुंदर भुरळ आहेस तू..


दिवसा अभावी असलेली सांज रात तू..

वसंताचा कोवळा आभास तू..


मनात लपवलेल एक गुपित आहेस तू..

जगायला एक निमित्त मात्र आहेस तू..


स्वप्न असलेले सत्य खूलवलेस तू..

माझ्या साठी विश्वासाचा अभिप्राय तू..


दुनिया तुझ्या भवती,

पण तुझ्यात च मग्न आहेस तू..


भावनिक अनं उर्मीक अशी धुंद बरसात तू..

माझ्या प्रेमाचा गुरु अनं पहिली चाहूल तू..


माझ्या या शब्दांपेक्षा अलौकिक आहेस तू..

माझ्या या कल्पनेची लेखणी आहेस तू..!