मी अडाणी मूड जरी झालो
तुझा सेवक म्हणूनच राहीलो।
अनिष्ट ही ईस्ट पाहिले
जीवनी बहु भार वाहिले।
चेहरास आली आसूंची झळाली
चांगुलपणाची फळे ही का मिळाली।
सोसले दुःख जीवनी भारी
तू आहे मात्र कल्पना सारी।
भक्तांचे असू जरी वाहे
त्यास पुसू कोणी ना पाहे।
कीर्तनातूनही निंदा वाहे
जो तो मी पणाचे गीत गाये।
कुठे शोधू मी गुरु माझे
बहुतांशी बगळेच झाले।
