मैत्री म्हणजे चुकीच्या गोष्टी विसरणे
मैत्री म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात पसरणे।
मैत्री म्हणजे एकमेकांच्या साथीतून उमलणे
मैत्री म्हणजे गुलाबाच्या फुला सारख खुलणे।
मैत्री म्हणजे दूर असूनही जवळ असणे
मैत्री म्हणजे सूर्यासारखे प्रतिबिंब ठसणे।
मैत्री म्हणजे निकाल निष्कलंक असणे
मैत्री म्हणजे जीवनातील सुंदर रहस्य जपणे।
मैत्री म्हणजे प्रेमाचे दुसरे रूप
मैत्री म्हणजे जीवनाचे नवे स्वरूप।
मैत्री म्हणजे जीवनातील अनमोल धागे
मैत्री म्हणजे हक्काची व्यक्ती मागे।
