जी मुलं राजकारणी लोकांच्या मागे लागतात
त्यांचा झेंडा हातात घेतात।
पक्ष पडला की बेरोजगार होतात
नंतर रोजगार नाही म्हणून वन वन फिरतात।

दिवसा मागून दिवस सरतात
त्यांचे संसार उघड्यावर पडतात।
नेते मात्र दुसऱ्या पक्षाकडून लढतात
जुने लोक भेटल्यावर काढता पाय घेतात।

म्हणून म्हणतो नोकर नाही राजे व्हा
लोकशाहीचा आधार व्हा ।
मतदानासाठी सावध व्हा
आपले महत्त्व दाखवण्यासाठी तत्पर व्हा।