हे मन उदास का झाले
दुःख अंतरी का दाटले।
तुझ शोधावयास हिंडलो
मग मी तुझ्यातच गुंतलो।

शब्द निशब्द झाले तुझ पाहून
सावरलो भावना आवरून।
रूप तुझे का मनी ठसले
तुला पाहुनी मन का फसले।

शब्दाने शब्द वाडीला
एक धागा मनी जडीला।
तुझ मनीचे गुज मला कळले
का दिवसा तुझे स्वप्न मला पडले।