समुद्री किनार्यावर बसलो होतो
कविता सुचत होती तसेच लिहीत होतो
अनंत आकाशा कडे बघून मुक्त वाहत होतो
जणू प्रेमात असण्याची हर्षद भावनेने गदगद होत होतो
सुंदर केशरी रंगात सूर्य मावळत होते
ह्या चित्रात मी देखील एक पात्र आहे असे समजून मिश्किल हास्य हसत होतो
कविता सुचली तसेच लिहीत होतो.....
समुद्राच्या लाटा जणू काही सुगम संगीत सारखे वाटू लागले
वाहत असलेला वार्याच्या ध्वनित जसे अनेक शंख नाद वाजू लागले
हेच जिवन आहे
आणि हे जिवन सुंदर आहे
असेच शब्द हळू हळू कागदावर प्रकट होत होते
हे सगळ अनुभवून मी त्यात एकरस होत होतो
कविता सुचली तसेच लिहीत होतो
सहजच प्रसन्न होत होतो
मी आहे फक्त ह्यात आनंद मानत होतो
परमेश्वराला धन्यवाद करत होतो
ही सुंदर सृष्टी बघण्यास मला डोळे आहेत
ती अनुभवण्यास मला चेतना आहे
आणि सहजच तिच्या प्रेमात पडण्याची विधा कशी बरी मला अवगत आहे?
असाच प्रश्न स्वतःला विचारात होतो
कविता सुचली तसेच लिहीत होतो
मी जणू एक निमित्त मात्र जसे
शब्द स्वतःहूनच कागदावर अवतरले
हे सगळ माझे हात आपोआपच लिहीत होते
हे सगळे पाहुन मी स्वतःशीच चकित होत होतो
कविता सुचली तसेच लिहीत होतो
मुक्त भावना कागदावर मूर्त रूप धारण करत आहेत
कवितेचा आकार घेत आहेत
मी आणि श्री रूप जणू एक झाले आहेत
माझा मी राहीलाच नाही
फक्त सृष्टी आणि सृष्टीचा रचनाकार
कविता रुपात ह्या देहातून संवाद साधत आहे
अहंकार सरत आहे
माझा मी राहीलाच नाही
फक्त परमेश्वराचे शब्द
ही त्यांचीच कविता
मी मात्र निमित्त होते होतो
कविता सुचली तसेच लिहीत होतो
कविता सुचली तसेच लिहीत होतो.......
-कवि ज्योत देव (दिव्येश).

