1 मे एकोणीसशे साठ साली,

महाराष्ट्र भूमी उदयास आली,

सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यांनी ती कणखर झाली,

अजंठा-वेरूळ लेण्यांच्या सौंदर्यात न्हाली,

संतांच्या अभंगाने पावन ती झाली,

स्वराज्याच्या सूर्याची उषा तिला मिळाली,

शेतकऱ्या-कष्टकऱ्यांच्या घामाने सुगंधित झाली,

शाहिरांच्या पोवड्याने ती रोमांचित झाली,

106 जनांनी दिली प्राणांची आहुती,

तेव्हा महाराष्ट्राच्या कुशीत मुंबई आली,

मौझ करते कोकण सागर किनारी,

फिरे पश्चिम घाटातून वेगवान लाल परी,

लख-लख ते इथे साडी वरची सोनेरी झरी,

मानाने मिरविती पुरुष फेटे भरझरी,

चविष्ट लागते ठेचा अन भाकरी,

भूमी ही जगात लय भारी.


- समीर