झुंझुमुंझु होताच कामाला ती जाय,
दिसभर राबती ती कष्टकरी माय.
लेकराला पान्हा पाजून स्वतः भुकेली राय,
दिसभर राबती ती कष्टकरी माय.
कुणी रानात राबती,
कुणी कारखान्यात राबती,
कुणी जाई वस्तू तर कुणी भाजी विकाय,
घर चालवायला अंवानी चालती,
ती नाजूक पावलांची माय.
मोचक्याच लुगड्यात किती वर्ष ती काढी,
घराचा गाढा विश्वासाने ओढी,
अंगी चिकटलेल्या नजरा घासून काढी,
तिच्याच हाती जीवनाची नाढी.
डोळ्यात तिच्या जग,
अन कुशीत तिच्या स्वर्ग हाय,
मायेचा झरा ती कष्टकरी माय.
- समीर


