एकच प्याला
एकच प्याला — जो प्याला तो ग्याला.
एक–एक म्हणता झाले अमाप,
शुद्ध हरपली अन झाला सुमाट .
उठून म्हणतो अ सकाळ झाली !
चंद्र कुठे दिसेना, अन सूर्य आला भाळी.
मग त्याला आठवण झाली —
रात्रीची बैठक तर अर्धीच राहिली.
ज्ञानाचा मग प्रकाश पडला,
"अर्धी कामे सोडू नयेत"
म्हणून मग परत प्यायला बसला.
एकाच प्याला — जो संपत तर नाही, पण संपवतो हे नक्की…
© ओंकार वाघमोडे.
