सूर नवा ध्यास नवा..


वय केवळ एक आकडा,

बालपणाचा सदा अंश हवा.

हर उलटत्या वर्षासोबत मिळू दे,

सूर नवा ध्यास नवा..


बालपणीचा काळ सुखाचा,

आठवणींचा रुचकर मेवा.

गतकाळाच्या अनुभवाची शिदोरी,

पण सूर नवा ध्यास नवा..


बालपणीचे सवंगडी, ती धमाल मस्ती,

मनी भूतकाळातील प्रसंगांचा थवा.

जुन्याशी घेऊ नका फारकत,

जरी सूर नवा ध्यास नवा..


आरंभास नाही वयोमर्यादा,

मनीचे बाल्य सदा जिवंत ठेवा.

तुमच्याही नकळत सापडेल तुम्हाला,

सूर नवा ध्यास नवा..


:- मोहित केळकर