कवी
ह्याला नको सागर
नको ह्याला पाऊस
ह्याला हवे ते हा निर्मितो
पुरवण्या शब्दांची हौस
रात्री ह्याला सूर्य दिसे
भर माध्यान्ही चंद्रमा नभी
अंगाची होताना काहिली
डोळ्यासमोर ह्याच्या हिमशिखरे उभी
कोणी म्हणे ह्याला दिवाणा
ह्याच्या शब्दांवर कोणा बंधने हवी
हा बेधुंद स्वच्छंद बेभान
खुश जरी ह्याला फक्त म्हंटले कवी..
:- मोहित केळकर

