मी यमक जुळवून कविता करतो,
कविता करायला यमक जुळवत नाही.
म्हणून शब्दांपेक्षा भावनांना महत्व देणाऱ्यांना,
माझी कविता सुधरत नाही..
र ला र, प ला प, जुळलाच पाहिजे,
असा असतो माझा प्रचंड हट्ट.
जितकी यमकं जुळवता आली,
कविता तितकीच फुगते तट्ट..
वामन पंडित माझे आदर्श,
उपाधी त्यांना मिळाली यमक्या.
यमक साधायला लाज कसली,
जेंव्हा गुरुस्थानी असा कवी खमक्या..
इथेही बघा हा हा म्हणता,
झाली तयार तीन कडवी.
ह्या पहा चारोळी अजून रचल्या,
स्फुरली कविता, आहे ना मी कवी?