कधी यादोंकी बारात..
कधी ताटातूट,
कधी जन्मोजन्मीची साथ..
कधी तू चहाचा घोट,
कधी व्हिस्कीचा पेग..
कधी खोल दरी,
तर कधी पहाडामधली भेग..
कधी मऊशार गवत,
कधी टोकदार बाभळी,
कधी हिरमुसलेलं तोंड,
तर कधी गालावरची खळी..
कधी हिरमुसु,
कधी खळाळणारं हसू,
कधी निष्कारण मुळुमुळू,
कधी मुद्दामच मुसुमुसु..
कधी तू आस,
कधी तू श्वास,
कधी तू म्हणजे मी,
हा आंधळा विश्वास..


