कडकडून चावली ती मधमाशी,
वाटलं आली का ती आपल्याच राशी.
पण तीच आहे ना मधाच्याही मुळाशी,
मग करा समझोता ह्या नकोत्या छळाशी.... (१)
जीवन पुरवणारी ही वृष्टी,
क्रोधते तेव्हा हादरते सृष्टी.
देतो शिव्याशाप आपण होतो दु:खीकष्टी,
सोयीस्करपणे विसरतो आपल्या हातून घडलेल्या गोष्टी.... (२)
धरणी मातेची तर आपण अपत्यं,
पण धरणीकंप हेही हृदयद्रावक सत्य.
वाटतं ह्या काल्पनिक नात्यात नाही कसलच तथ्य,
पण आपण कधी पाळली का हो ह्या आईने आखलेली पथ्य???? (३)
पण तुझीच पोरं आहोत गं भूमाते नको करू शिक्षा,
कोणाला दुष्काळ तर कोणाला महापूर नको वरूण राजा, रूंदाव तुझ्या कक्षा,
मधाची चवच रेंगाळू दे गं मधुराणी, डसून नको पाहू परीक्षा,
ह्या पामराच्या आहेत अशाच माफक अपेक्षा.... (४)
:- मोहित केळकर