ढगांची सावली नाहीच,
झोंबतात उन्हाचे चटके.
घरी असलेल्या पिलांसाठी,
माय-बाप वाहतात ओझे.
गरीबी जन्माची शिदोरी,
जी पिढ्यानं पिढ्या पुरली.
वाटते आता तरी व्हावी,
लेकरांची ह्या दिवाळी.
आग लागता आभाऴी,
सुरू वणी साठी वणवण.
काजवे ह्या डोळ्यातील,
थबकती रात्री अंथरुणातं.
उन्ह, वारा, पावसाचं,
जीवन नाही हे नवसाचं.
डोई खांद्यावर ओझे,
सुरू रोजचीच धडपड
कधी संपेल हा प्रवास,
मनी असते रे ही आस.
मोठं साहेब साहेबिन होऊन,
बाळांनो द्याल ना रे आधार !
कवी- डाॅ महेश®बालपांडे, ☎️ 7875135787

