तुला शोधता ,
मी हरवलो .
कुणी शोध कुणाचा घ्यावे।।धृ।।

नववधु प्रिया,
अश्रु ढाऴिता.
नवपदर ओला भिजे.

असंख्य शुभेच्छुक,
उपस्थित मंडपी,
संसार सुखाचा घडे.

फुलासंगे कळ्या असती,
सुगंध पसरवी अंतरी,
सहवास जरी काट्यांच्या असे.

सासर घर तुझे नवे,
तिथलीच आता नाती,
जोवरी नवा जन्म मिळे.

कवीराज :- *महेश®बालपांडे, तुमसर*?️
☎️7875135787