तू खुशाल दे पहारा सीमेवर,
इथे आम्ही आहोत सज्ज.
मिळूनी करू शत्रूंशी दोन हात,
इथे तुझ्याच अंदाजात.

जन म्हणतील. हे विपरीत,
का घडले.असे सारे,
देशप्रेमी आता देशद्रोही कसे झाले.
देवु उत्तर मिऴुनी तयांना,
इथे तुझ्याच अंदाजात.

इथे कौरवांचा कुऴ,
माजुनी झाला, सैरावैरा.
सुदर्शन बनुनी आता करू संहार,
इथे तुझ्याच अंदाजात.

अन्यायाला वाचा फोडून,
फेडु बलिदानाने पांग सारे.
आले मरण समोर जरी स्वागत करू,
इथे तुझ्याच अंदाजात.

कवी:- डाॅ. महेश®बालपांडे, तुमसर