अजूनही तुझी साथ,
हवीहवीशी वाटे.
क्षणात तु तोडिले नाते,
मज न दुःख याचे.
विरलेल्या आठवणींना,
जेव्हा मिळतो किनारा,
नाव तुझेच ओठांवर,
फिरूनी पुन्हा येते.
काय चुकले माझे,
मला न अजूनी कऴले.
अभिमान होता तो,
ज्याने तुला होते ग्रासले.
वेळ वळूनी आली,
पण वळणावर तू नव्हतीस.
नियतीन जरी पुसली वाट,
खरंच का तू ही प्रीत विसरलीस?
शब्दरचना:- कवी - महेश®बालपांडे, तुमसर.

