ज्यांनी घाव दिले हृदयी,
ते सारे माझेच होते.
जेव्हा ही गेलो जवळ त्यांच्या,
डोळ्यांत प्रेमाचे भाव होते.

समजू शकलो नाही,
कधीच मी खेळ त्यांचा.
खेळतांना नेहमी ते,
माझ्याच संघात होते.

मी जिंकून ही हरायचो,
त्यांच्या हरून ही मेजवान्या.
धाव मनातली आकाशा पुढे ही,
कधी न कळली माझी व्यथा कुणाला.

अधांतरी ढकलून मला,
घावांवर मरहम ही त्यांचे.
डोळे मिटताच भरवश्याने,
जखमेवरं मीठ त्यांनीच चोळले.

कवीराज :- डाॅ. महेश®बालपांडे,तुमसर?️
☎️7875135787