ते गाव तुझेच होते,
मी कधीतरी तिथे आलो होतो.
आठवते ते शेत शिवारं,
कैऱ्यांनी भरलेली झाडं.
उन्हातही त्या आडोशाला,
मी आमराईत सुखावलो होतो.
ते गाव तुझेच होते,
मी कधीतरी तिथे आलो होतो.
जळजळणाऱ्या ह्या मनाला,
सूर कधी तरी गवसत नव्हता.
खळखळणाऱ्या नदी तीरावर,
तृप्त होऊन मी शीतल झालो.
ते गाव तुझेच होते,
मी कधीतरी तिथे आलो होतो.
आठवणी माझ्या सर्व सोडून आलो,
मित्रांनाही भेटून आलो.
आल्यावर परतून माघारी,
कळले पण मला बऱ्याच उशिरा.
ते गाव तुझेच होते,
मी कधीतरी तिथे आलो होतो.
-- डाॅ. महेश®बालपांडे
