मनात असणाऱ्या कल्पना,
डोळ्यात साकार होतात.
दिवस असो वा रात्र,
स्वप्न बनून येतात.

स्वप्न असती फुकट,
पैशाचा नसतो हिशेब.
मनसोक्त बघा स्वप्न,
पूर्ण होतात लाखातून एक.

गरीब असो वा श्रीमंत,
स्वप्न करत नाही भेद.
कुणी स्वप्नात बनतात राजे,
कुणास स्वप्नाने लागते वेड.

स्वप्न खेळतात जीवनाशी,
जीवन जुळले स्वप्नांशी.
स्वप्नांच्या नादी लागून या,
नका करू खेळ आयुष्याशी.

कवीराज :- डाॅ. महेश®बालपांडे, तुमसर
☎️ 7875135787