घुंगराच्या तालावर बघा,
ढवळ्या-पवळ्याचा थाट.
हातात कासरं घेऊन,
उभा बळीराजा बैलपोळ्यात.
आदल्या दिवशी माय-बाप,
वाण भरे, भरे कोटा.
फाटके कपडे असले जरी,
त्यांच्या प्रेमात नसतो तोटा.
रंगरंगोटी पाठीवर,
शिंगांना बेगडाचा साज.
नटून-थटून चाले सवारी,
असे अंगावर प्रेमाची झालर.
गोड पुरणपोळी सुगरण,
संग भात, भाजी, वरण.
अळूच्या पानांच्या वड्या,
तृप्त खाऊन होतो नंदीश्वर.
श्रावण महिन्याचा मान,
पूजन शंकराच्या गणांचा.
नागपंचमीनंतर येतो सण,
माझ्या ढवळ्या-पवळ्याचा.
कवीराज :- डाॅ. महेश® बालपांडे 'अनपढ'
