काय सखे सांगू तुला,
निरोप देऊ कसला.
तुझ्याविना व्यर्थ गेली,
माझी होळी, दिवाळी,दसरा.
होळीचे रंग बनुनी,
आली असतीस बेरंग जीवनी.
दिवाळीच्या प्रकाशात मी,
उमलून गेलो असतो साजणी.
कुठे चुकले काही कऴेना,
तु स्वप्न होतेस मना पटेना.
दसरा दूर सारून आला,
जीवंत पणी मला मारून गेला.
तरी ही तुझी आज प्रतीक्षा,
जाणूनघे हे सत्य कडू.
असेल ही प्रेम परीक्षा,
तु येतेस की आधी येते मृत्यू.
शब्दरचना:- कवी- महेश®बालपांडे, तुमसर.
mob.no: 7875135787

