निजतात सर्व शांत

इथे निजतात सर्व शांत,
विसरून सारी नाती.
तिथे हिस्स्यासाठी घरात,
भांडणे भावात जुंपली.

अजूनही नाही विसावा,
त्या मृतात्म्याच्या चितेला.
क्षणात सगळे दुरावले,
साक्षी होते जे सुख- दुःखाला.

नजर चुकवून जणांची,
रडते हृदय मुलाचे.
तरीही हवी होती मुलगी,
म्हणती जन, रडण्यासाठी आवेशाने.

कालचक्र असेच सुरू,
कुणाचा मागे-पुढे प्रवास.
इथे तुटतात सारी नाती,
जेव्हा निजतात सर्व शांत.

शब्दरचना:- कवी- महेश®बालपांडे, तुमसर.
☎️7875135787