माझ्या मनातील वेदनांना,
कोण करून देईल वाट.
वाटेवर एकटेच चालतांना,
कोण देईल मज साथ.

बोल विरहाचे असले जरी,
अर्थात नव्हता विरह.
सर्व जण अनाथ आहेत,
जो तो चालला एकटाचं.

जन्म देऊन बाळाला,
फेकले नालीच्या कडेला.
नर- नारी ते आज सज्ज,
अनाथालयाच्या सेवेला.

जिथे नितांत गरज,
तिथे फुलेना अजूनही फुल.
जन्म देऊन ते मोकळे,
म्हणती तारुण्यातील भूल.

कवीराज :- महेश®बालपांडे,तुमसर (भंंडारा) ☎️7875135787