मी तुझ्यासाठीच लढत आहे,
हे युद्ध प्रेमाचे... प्रेमाने.
अजून किती घायाळ करशील,
सखे जन हे आपल्या नजरेने.

तो काळ कोणता होता,
हा काळ कोणता आहे.
तेव्हा प्रेमाने... प्रेमाचा घात व्हायचा.
इथे घात करण्यासाठी प्रेम होत आहे.

इथे जाती, धर्म, पंथ सर्व,
मंगळ ग्रहाच्या पलीकडे निघून गेले.
आपले कोण शोधण्यासाठी,
थोडेसे मरावे लागत आहे.

आता मस्तकी टिळा लाऊन,
जेव्हा मी निघतो घरुन.
बघणारे नजरा चुकवुन,
नजरेत नजर बंद होत आहेत.

कवी :- डाॅ. महेश®बालपांडे, तुमसर
☎️ 7875135787