मोकाट वाऱ्यात एक ज्योत,
फडफडत जळत होती.
आणि प्रकाश त्याच्या,
सभोवताल उजळून नेई.

बंडखोर वाऱ्याच्या प्रहार,
एकामागून एक सुरूच होता.
तरी ती ज्योत वाऱ्याशी,
झुंज देत जळत होती.

त्या ज्योतिस लाभलेले बळ,
ती उभी असलेल्या तेलात होते.
ते तेल अनेक जातीच्या,
तेल बियांचे होते.

पण ते तेल एकरूप होऊन,
ज्योतिस बळ देत होते.
व मिळुन मोकाट वाऱ्याशी,
अंतीम श्वासापरी झुंज देत होते.

शेवटी वारा हरून गेला,
ज्योत प्रखरतेने जळत राहिली.


कवीराज :- डाॅ. महेश®बालपांडे, तुमसर(भंडारा) ☎️7875135787