बंध तुटल्यानंतर कळले,
मला, बंधने का असावीत.
चीर हरण द्रोपदीचे,
होऊन गेले सभेत.
बसली होती विद्वान,
डोळे मिटून उजेडात.
असेच घडले होते सारे,
जानकी संगे वनात.
बंधन तोडताच लक्ष्मणाचे,
विपरीत घडले क्षणात.
दशरथाचे कैकईस वचन,
वरदान ते ही श्राप ठरले.
रामास तीने रंक केले,
मायेचे तोडून सारे बंध.
कविराज :- डाॅ. महेश®बालपांडे, तुमसर,
जि- भंडारा (महाराष्ट्र)
☎️ 7875135787


