पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस, पांढरे पिसाहुनी सुकुमार काहिसे देता-घेता त्यात थरारे मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला देता-घेता उमटे काही, मिना तयाचा त्यावर जडला असेच काही द्यावे-घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा देता-घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा