नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा। आवरण आरूपा कोण ठेवी॥ १॥ तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण। रहित कारण स्वयंप्रकाश॥ २॥ याही शब्दामाजी वाचा न लागे। मार्ग पैं गा लागे निर्धारिता॥ ३॥ म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा। चिद्रूप अवघा दिससी साच॥ ४॥