केव्हा कसा येतो वारा जातो अंगाला वेढून अंग उरते न अंग जाते अत्तर होऊन खाली सुगंधित तळे उडी घेतात चांदण्या हेलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या