केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं। मृत्तिके माझारीं नाचतसे॥ १॥ विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ। नेत्रीं वाहे जळ सद्गसदीत॥ २॥ कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर। तो गोरा कुंभार हरिभक्त॥ ३॥