केशवाचे भेटी लागलें पिसें। विसरलें कैसें देहभान॥ १॥ झाली झडपणी झाली झडपणी। संचरलें मनीं आधीं रूप॥ २॥ न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी। न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा॥ ३॥ म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त। सुखरूप अद्वैत नामदेव॥ ४॥