कायसास बहु घालिसील माळ। तुज येणेविण काय काज॥ १॥ एकपणें एक एकपणें एक। एकाचें अनेक विस्तारिलें॥ २॥ एकत्व पाहतां शिणलें धरणीधर। न चुके येरझारा संसाराची॥ ३॥ म्हणे गोरा कुंभार कोणी नाहीं दुजें। विश्वरूप तुझें नामदेवा॥ ४॥