कशि तुज समजावु सांग? का भामिनि उगिच राग? हास्याहुनि मधु रुसवा हेमंती उष्ण हवा संध्येचा साज नवा हा का प्रणयानुराग? चाफेकळि केवि फुले? ओष्ठ-कमल जेवि उले? भोवति मधुगंध पळे का प्रसन्‍न वदन-राग? वृत्तींचा होम अमुप त्यात जाळु गे विकल्प होउनिया निर्विकल्प अक्षय करु यज्ञयाग ओठांचे फेड बंध गाइ गडे मुक्त छंद श्वासांचे करू प्रबंध हृदयांचे मधु प्रयाग