बघणार्‍या माणसाच्या जिवाचे हाल लाडाने वळून बघायची खोड नाजुक नखर्‍याला नाही या तोड डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल
केसांत सुरंगी रंगात ग
विजेची लव्‌लव्‌ अंगात ग खट्याळ पदराला आवर घाल जिंकीत जिंकीत जातेस तू ज्वानीचं गाणं हे गातेस तू हासून होतेस लाजून लाल उरात लागलेत नाचाया मोर कोणाच्या गळ्याला लागेल दोर्‌? माझ्या या काळजाचा चुकेल ताल